Loading Seva




साळुंके पुजारी मार्फत ऑनलाइन पूजा विधी बुकिंग करून प्रसाद घरपोच प्राप्त करें.

श्री तुळजाभवानी देवीची शास्त्रशुद्ध पूजा, कुलधर्म-कुलाचार आणि नवरात्र उत्सव विधी संपन्न करा. घरबसल्या ऑनलाइन पूजा बुकिंग उपलब्ध.

दूध/दही/ मध/साखर/केळी आणि पवित्र सामग्री देवतेचा विशेष अभिषेक केला जातो.





श्री तुळजाभवानी मातेचे वंशपरंपरागत पुजारी परिवारातील मुख्य पुजारी ,तुळजापूर
श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या धार्मिक परंपरा, पूजा-विधी आणि भाविक सेवा यांच्याशी जोडलेले श्री. नागेश कालिदास साळुंके हे भाविकांना विविध धार्मिक पूजा सेवा, धार्मिक माहिती आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देतात. वंशपरंपरागत धार्मिक परंपरांचा आदर राखत, भाविकांच्या श्रद्धा आणि धार्मिक भावनांचा सन्मान करून प्रत्यक्ष तसेच उपलब्धतेनुसार अप्रत्यक्ष (Online) पूजा सेवा भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. धार्मिक परंपरेसोबत आधुनिक शिक्षण आणि डिजिटल माध्यमांचा उपयोग करून श्री तुळजाभवानी मातेची धार्मिक माहिती, पूजा-विधी, उत्सव व नवरात्र महोत्सव, मंदिराशी संबंधित माहिती, धार्मिक परंपरा, इतिहास आणि भाविकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन अधिक सुलभ स्वरूपात उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. आमचे उद्दिष्ट “श्रद्धा, परंपरा आणि आधुनिक डिजिटल माध्यम यांना जोडणारा विश्वासाचा सेतू निर्माण करणे.” श्री तुळजाभवानी मातेची उपासना, धार्मिक परंपरा आणि तुळजापूरचे आध्यात्मिक महत्त्व याबाबतची माहिती भाविकांना अधिक सुलभ, विश्वासार्ह आणि व्यवस्थित स्वरूपात उपलब्ध करून देणे. तसेच, तुळजापूरला प्रत्यक्ष येणाऱ्या तसेच विविध कारणांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध धार्मिक सेवा व माहिती डिजिटल माध्यमातून सुलभ करणे हा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.


या दिव्य सोहळ्यांचे साक्षीदार होण्यासाठी आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आम्ही भाविकांना आमंत्रित करतो.

घटस्थापना पूजा विधी आणि मांडणी चैत्र नवरात्रीमध्ये नैसर्गिक बदलांना महत्त्व असल्याने पूजेमध्ये काही विशेष गोष्टींचा समावेश होतो: १. घटस्थापना (कलश): एका तांब्याच्या किंवा मातीच्या कलशात पाणी, सुपारी, नाणे आणि दुर्वा टाकून त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवावा. २. धान्य पेरणी: कलशाखाली मातीच्या पात्रात नऊ प्रकारचे धान्य (नवधान्य) पेरले जाते. चैत्र नवरात्रीत उन्हाळ्याची सुरुवात असल्याने मातीच्या गारव्याचा आणि धान्य उगवण्याचा संकेत महत्त्वाचा असतो. ३. अखंड दीप: नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलित ठेवला जातो. ४. नैवेद्य: दररोज
"मंदिर रखरखावासाठी बंद असेल..."