Loading Seva
श्री तुळजाभवानी पुजारी मार्फत मंदिराची माहिती , दैंनदिन बदल आणि आध्यात्मिक माहिती एक प्रयत्न .

महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आणि साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे बालघाटाच्या डोंगरावर वसले आहे. दरवर्षी कोट्यवधी भाविक आईच्या दर्शनासाठी येथे येतात. या लेखात आपण मंदिराचा परिसर आणि तेथील नित्य विधींची माहिती घेणार आहोत.

आरतीचा अर्थ व महत्त्व: "दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

शारदीय नवरात्र उत्सव २०२६ ची घटस्थापना संपूर्ण माहिती नवरात्र उत्सव २०२६ Sharadiya Navaratra Utsav 2026

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी मंचकी निद्रेची पारंपरिक धार्मिक सेवा सुरू होते. धार्मिक रूढी-परंपरेनुसार, ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळपासून श्री तुळजाभवानी मातेची मूळ मूर्ती सिंहासनावरून उतरवून चांदीच्या पलंगावर निद्रेसाठी विराजमान केली जाते.
श्री तुळजाभवानी मातेचे वंशपरंपरागत पुजारी यांच्या ऑनलाइन सेवा श्री तुळजाभवानी मातेच्या पूजा सेवेसाठी किंवा प्रसादासाठी आपण वेबसाइटवर प्रथमच येत असाल, तर ऑनलाइन सेवा वापरणे अगदी सोपे आहे.